Whats new

मिग-27 दुघर्टनाग्रस्त

कोलकता  भारतीय हवाई दलाचे मिग-27 हे लढाऊ विमान आज पश्‍चिम बंगालमधील अलीपूरद्वार येथे कोसळून दोन नागरिक मृत्युमुखी पडले. वैमानिकाने पॅराशूटच्या साह्याने बाहेर उडी टाकत स्वत:चा जीव वाचविला. विमान कोसळताना ते दोन नागरिकांच्या जवळ कोसळल्याने ते दोघेही मरण पावले. वैमानिकही जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमान कोसळल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाल्याने आसपासच्या घरांवरील पत्रे उडून गेले. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

< < Prev Next >>