Whats new

ब्रिटनमध्ये कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला स्पष्ट बहुमत

 

लंडन जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या ब्रिटनची सूत्रे आपल्याकडेच ठेवण्यात पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यशस्वी ठरले आहेत. झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॅमेरून यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पार्टीने 650 पैकी 329 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. चांगला प्रचार करून लढत चुरशीची करणा-या लेबर पार्टीला 232 जागांवर समाधान मानावे लागले.

महत्त्वाचे मुद्दे

- पंतप्रधान कॅमेरून 10, डाऊनिंग स्ट्रीटवर कायम

- कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला स्पष्ट बहुमत

- लेबर पक्षाच्या जागा घटल्या

- स्कॉटिश नॅशनल पार्टीला स्कॉटलंडमध्ये 59 पैकी 56 जागा

- लेबर पक्षाच्या प्रचारप्रमुखांनाच पराभवाचा धक्का

- लिबरल डेमोक्रॅट्‌स पार्टीच्या बहुतेक मोठ्या नेत्यांचा पराभव

- कॅमेरून यांनी राणीची भेट घेतली