Whats new

वीस वर्षांची युवती 'हाउस ऑफ कॉमन्स'मध्ये

 

लंडन स्कॉटिश नॅशनल पार्टीची उमेदवार मेरी ब्लॅक या वीस वर्षांच्या महाविद्यालयीन युवतीने लेबर पक्षाच्या उमेदवाराला हरवून इतिहास घडविला आहे. तब्बल 350 वर्षांनंतर ब्रिटनच्या संसदेतील ती इतक्‍या तरुण वयातील सदस्य ठरली आहे.

पाइस्ली-रिन्फ्रेशायर मतदारसंघातून मेरी ब्लॅक उभी होती. तिला 23,548 इतकी मते मिळाली. या भागातून विजयी होण्याची दाट शक्‍यता असलेले लेबर पक्षाचे उमेदवार डग्लस अलेक्‍झांडर यांना 17,804 मते मिळाली. अलेक्‍झांडर हे त्यांच्या पक्षाचे निवडणूक प्रचार प्रमुख असल्याने त्यांचा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. लेबर पक्षाला स्कॉटलंडमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नाकारल्याचा फटका त्यांना बसल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

मेरी ब्लॅक ही महाविद्यालयाच्या अखेरच्या वर्षात शिकत असून, राजकारण आणि सार्वजनिक धोरण हे तिचे अभ्यासाचे विषय आहेत. विशेष म्हणजे तिच्या घरातील सदस्य इतकी वर्षे लेबर पक्षालाच मतदान करत होते. इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धाला विरोध म्हणून तिने मोठ्या प्रमाणावर निदर्शने काढत राजकारणात पाऊल टाकले. विविध ठिकाणी प्रवास करताना दुर्लक्षित घटकांची परिस्थिती पाहून त्यांना सामाजिक न्याय देण्यासाठी राजकारणात आल्याचे तिचे म्हणणे आहे.

< < Prev Next >>