Whats new

भारतातील नवीन योजना - 2015

 

योजना आणि वैशिष्ट्ये
पंतप्रधान विमा सुरक्षा योजनाः 
बारा रुपयांच्या नाममात्र वार्षिक हप्त्यांवर अपघात विमा मिळणार. ही योजना 18 ते 70 वर्ष वयोगटातील लोकांसाठी असेल. या माध्यमातून केवळ 330 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचा जीवनविमा मिळेल. सर्व बँक खातेधारकांना ही योजना लागू आहे. एखाद्या अपघातात मृत्यू झाल्यास अथवा जखमी झाल्यास या विम्याचे संरक्षण मिळेल. 

अटल पेन्शन योजना 
ही योजना 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांसाठी असून सर्व बँक खातेधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच वयाची साठी गाठणा-यांना या योजनेअन्वये 1000 ते 5000 रुपये एवढे निवृत्तिवेतनही मिळेल. यासाठी केवळ 42 ते 210 रुपये एवढा मासिक हप्ता
निर्धारित करण्यात आला आहे. 

पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना 
केवळ 330 रुपयांच्या वार्षिक हप्त्यावर दोन लाख रुपयांचा विमा मिळेल. ही योजना 18 ते 50 वर्ष वयोगटातील लोकांसाठी आहे. बँकांमधील सर्व बचत खातेधारकांना या योजनेचा लाभ घेता येईल. दरवर्षी नव्याने या विम्याचे नूतनीकरण केले जाईल.

< < Prev Next >>