Whats new

पुढील वर्षी भारतात ब्रिक्स चषक फुटबॉल स्पर्धा

 

औद्योगिक क्षेत्रातील अग्रणी संस्था आसोचाम यांच्या सहकार्याने पुढील वर्षी भारतात १७ वर्षांखालील गटाची ब्रिक्स चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेबाबत स्पर्धा संयोजक जोओ वाझ व आसोचामचे सरचिटणीस डी. एस. रावत यांच्यात लवकरच करार होणार आहे. या कराराचे वेळी केंद्रीय क्रीडा सचिव अजित शरण व अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सरचिटणीस कुशल दास हे उपस्थित राहणार आहेत.

< < Prev Next >>