Whats new

हैदराबादमध्ये ‘गुगल’ उभारणार आशियातील सर्वात मोठा कॅम्पस

 

नेटविश्‍वातील आघाडीचे सर्च इंजिन असलेल्या ‘गुगल’ने हैदराबादमध्ये आशियातील स्वत:चा पहिला कॅम्पस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलचं अमेरिकेबाहेरचा अशा प्रकारचा हा पहिलाच कॅम्पस असून यामध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

तेलंगणाचे माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री के टी रामाराव अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले असताना गुगल आणि तेलंगणा सरकारमध्ये यासंदर्भातला करार झाला. सुमारे वीस लाख चौरस फुटांवर हा कॅम्पस उभारण्यात येणार आहे. गुगल या कॅम्पसमुळे पुढील चार वर्षांत 6500 नव्या नोकर्‍या मिळतील आणि गुगलच्या देशातील कर्मचार्‍यांची संख्या 13000 वर जाईल.