Whats new

काळा पैसा'संबंधी विधेयक राज्यसभेत मंजूर

 

परदेशांत दडविलेला काळा पैसा व करआकारणी विधेयक 2015ला राज्यसभेत आवाजी बहुमताने मंजुरी मिळाली. यापूर्वी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले.   दरम्यान, भारतीयांनी परदेशांत दडविलेला काळा पैसा परत आणण्याबाबतची माहिती भारत सरकारला सहज उपलब्ध होण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे लक्षात घेता 2017 पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत मान्य केले. भारताच्या प्रयत्नांना फ्रान्स व इंलंडसह काही देशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांच्याकडून आलेल्या 624 पैकी 422 करबुडव्या "काळा पैसा‘वाल्यांना केंद्र सरकारने गुन्हेगारी खटले भरून कोर्टात खेचले आहे. शिवाय जर्मनीतल्या लिंचेस्टाईन बॅंकेत काळा पैसा ठेवणाऱ्या 20 एतद्देशीयांवरही गुन्हे दाखल केले गेले आहेत. 7 विभागांत व 65 कलमांत विभागलेल्या या कायद्यानुसार आता विदेशातील काळा पैसा असल्याची माहिती कोणी दडवून ठेवली, तर अशा गुन्हेगारांना मालमत्ता जप्तीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद आहे. अर्थात, त्यासाठी संबंधितांना 30 अधिक 30 अशा किमान 60 दिवसांच्या कालावधीची टप्प्याटप्प्याने संधी देण्यात येईल. 

< < Prev Next >>