Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

200 फुटांपेक्षा जास्त बोअरवेल खणल्यास तुरुंगवास

महाराष्ट्रातील धरणीची पाणीपातळी घसरल्यानं चिंतेत पडलेल्या राज्य सरकारनं आता कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे.  कारण यापुढं राज्यात जो कुणी 200 फुटापेक्षा खोल बोअरवेल घेईल, त्याला चक्क तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

सधन आणि गब्बर शेतकरी उन्हाळ्यातही आपली पिकं हिरवीगार राहावीत, यासाठी मोठ्या प्रमाणावर बोअरवेल घेत आहेत. त्यासाठी जमिनीच्या पोटात हजार-हजार फूटापर्यंत खड्डे घेतले जात असल्याचं समोर आलं आहे.

त्यामुळे पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर यांनी याबाबतचा कडक निर्णय घेतला आहे.

 सध्या महाराष्ट्रातील 150 हून अधिक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. सलग दोन-तीन वर्ष पडत असलेल्या दुष्काळामुळं तर यात आणखी भर पडत आहे. त्यामुळं सरकारनं महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून आता बोअरवेलवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 काय आहे शिक्षा?

  • पहिल्यांदा नियम मोडल्यास दहा हजारांचा दंड
  • बोअरवेल मशीनचा परवाना रद्द
  • गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास सहा महिने शिक्षा
  • 25 हजार रुपयांचा दंड
< < Prev Next >>