Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

नव्या युरिया धोरणाला केंद्राची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन युरिया धोरणाला मंजुरी दिली. या धोरणामुळे आता चार वर्षांत रासायनिक खते आणि खत उत्पादनांमध्ये आत्मनिर्भर बनणे आणि शेतक-यांना वेळेवर रासायनिक खते पुरविणे शक्य होणार आहे. भारतामध्ये प्रतिवर्षी २ कोटी २० लाख टन युरियाचे उत्पादन केले जाते. तरीही देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी 80 लाख टन युरिया आयात करावा लागतो. 


मंत्रिमंडळाने पुढील चार वर्षांसाठी नवीन युरिया धोरण ठरवले आहे. शेतक-यांना वेळेवर युरिया पुरवठा करणे आणि अनुदानाचे सुसूत्रीकरण करणे आहे, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोचे महासंचालक फ्रांक नोरोन्हा यांनी सांगितले आहे. शिवाय, 2015-16 या वर्षासाठी फॉस्फेट आणि पोटॅश-आधारित असलेल्या खतांना स्थिर अनुदान देण्याचे