Whats new

भारत-चीनमध्ये 24 महत्त्वपूर्ण करार

 

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या चीन दौऱयाच्या दुसऱया दिवशी पंतप्रधान मोदी आणि चीनचे पंतप्रधान ली क्विंग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर 24 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्या. या वेळी ‘गार्ड ऑफ ऑनर’ने मोदींना सन्मानित करण्यात आले.

चीन दौऱयात आज मोदींचे पेईचिंगमध्ये शानदार स्वागत करण्यात आले. यानंतर ली आणि मोदी या उभय नेत्यामंध्ये अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाली. सीमावाद, गुंतवणूक आणि इतर विविध क्षेत्रातील परस्पर सहकार्याबाबतही या वेळी चर्चा झाली. यानंतर रेल्वे, शिक्षण, अंतराळ आणि कौशल्य विकास यासह अन्य लहान मोठया अशा तब्बल 24 करारांवर दोन्ही नेत्यांनी स्वाक्षऱया केल्या.

तीन दिवसांच्या चीन दौऱयात मोदींनी काल चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या सोबत चर्चा केली होती. त्यानंतर दौऱयाच्या दुसऱया दिवशी त्यांनी चीनी पंतप्रधान ली क्विंग यांच्यासोबत चर्चा आणि 24 करांरावर स्वाक्षऱया करूनहा दौरा फलदायी ठरविण्यात यश मिळविले आहे.