Whats new

तेजस्विनीला सुवर्णपदक -2015

भारताच्या तेजस्विनी सागरने जागतिक शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक पटकावले. नवव्या आणि अंतिम फेरीत औरंगाबादच्या तेजस्विनीने श्रीलंकेच्या कविन्य मियुनी राजपक्षवर विजय मिळवत ही सुवर्णमय कामगिरी केली. १५ वर्षांखालील मुलांमध्ये आनंद नादरने रौप्यपदक आणि १७ वर्षांखालील मुलींमध्ये सलोनी सापोळेने रौप्यपदक जिंकले.