Whats new

कोल्हापूरचा संदीप पाटील ‘सम्राट केसरी’

सम्राट स्पोर्ट्स अॅकॅडमीतर्फे सेक्टर-६मध्ये झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या संदीप पाटीलने ‘सम्राट केसरी’ किताब मिळवला. या स्पर्धेत ठाणे, मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक कुस्तीपटू सहभागी झाले होते.

ज्येष्ठ क्रीडा संघटक बाळ वाडवलीकर यांच्या हस्ते सम्राटला गौरवण्यात आले. तत्पूर्वी, गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी कुस्ती आखाडय़ाचे विधिवत पूजन केले. कुस्त्यांचे संचालन सुरेश जाधव यांनी केले.

कुस्त्यांचा फड रंगण्यापूर्वी राहुल ससाणे  यांच्या मार्गदर्शनाखाली जिम्नॅस्टिक, मल्लखांब तसेच रवीकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंगची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

< < Prev Next >>