Whats new

भारताची वित्तीय तूट 10.99 अब्ज डॉलर्सवर

भारताच्या निर्यातीत एप्रिलमध्ये घट झाली आहे. निर्यातीत सलग पाचव्या महिन्यात घट झाली आहे. एप्रिल दरम्यान निर्यात 22.05 अब्ज डॉलरवर (सुमारे 138400.44 कोटी रुपये) पोचली आहे. त्यात 13.96 घट झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात भारताने 25.63 अब्ज डॉलरची (सुमारे 154718.60 कोटी रुपये) निर्यात केली होती. 

पेट्रोलियम उत्पादने, रत्ने आणि दागिने, इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक वस्तू, मांस, सागरी उत्पादने, कोळसा आणि खनिजे आणि खाद्य-तेल-यांच्या निर्यातीला एप्रिलमध्ये फटका बसला आहे. विशिष्ट देशातील निर्यतीची आकडेवारी सध्या उपलब्ध झालेली नाही. मात्र  युरोप, जपान, आसियान देश आणि चीन यांच्याकडून होणाऱ्या निर्यातीत घट झाल्याचे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले आहे. 

आयात :
एप्रिल दरम्यान आयातीत देखील घट झाली आहे. एप्रिलमध्ये भारताने 33.04 अब्ज डॉलरची (सुमारे 207380.63 कोटी रुपये) आयात केली आहे. जी गेल्या वर्षी याच काळात 35.72 (सुमारे 215593.93 कोटी रुपये) अब्ज डॉलर होती. 

कच्चे तेल आयात : 
एप्रिलदरम्यान कच्च्या तेलाच्या आयात मूल्यात 42.65 टक्के घट झाली आहे. एप्रिलमध्ये 7.44 अब्ज डॉलरचे कच्चे तेल आयात करण्यात आले होते. गेल्यावर्षी याच महिन्यात मात्र 12.97 अब्ज डॉलर मूल्याचे तेल आयात करण्यात आले होते. 

सोने-चांदी आयात : 
सोन्याची आयात एप्रिलमध्ये 78.33 टक्क्यांनी वाढली असून  3.1 अब्ज डॉलरवर पोचली आहे. मात्र, चांदीच्या आयातीत 31 टक्के घट झाली आहे. एप्रिलमध्ये फक्त 0.32 अब्ज डॉलर मूल्याच्या चांदीची आयात