Whats new

सौर ऊर्जेवर धावणारी नागपूर मेट्रो जगातील पहिली रेल्वे

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात जर्मनीने गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली असून, सौर ऊर्जेवर धावणारी नागपूर मेट्रो जगातील पहिली रेल्वे ठरणार आहे, असे नागपूर रेल्वे मेट्रो कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले.
नागपूर मेट्रो प्रकल्पात ३० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी जर्मनी गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. महिनाअखेरीस जर्मनी तज्ज्ञांची चमू नागपुरात येत आहे. इंडो-जर्मनी सोलर कॉर्पोरशन कार्यरत आहेत. भारत आणि जर्मनीमध्ये औपचारिकता पूर्ण होऊन करार झाल्यास नागपूर मेट्रो रेल्वे अशा प्रकारची जगातील पहिली ठरणार आहे. या प्रकल्पावर २०० कोटी रुपयांची गुंतवणुकीची आवश्यकता आहे. ‘सोलर पॅनल’ लावण्यासाठी अतिरिक्त जागेची गरज भासणार नाही. मेट्रो स्थानकाच्या इमारतीवर त्या बसवण्यात येतील. नागपूर मेट्रो रेल्वेला लागणाऱ्या ऊर्जेच्या ४० टक्के ऊर्जा सौर ऊर्जा राहणार आहे. उर्वरित ऊर्जा औष्णिक ऊर्जा राहील. २०६० मध्ये नागपूरची लोकसंख्या किती असेल याचा अंदाज बांधून नागपूर मेट्रो रेल्वे योजना आखण्यात आली आहे .