Whats new

'किंग्डम ऑफ एन्क्लाव्हा' सर्वात नवा देश

 दक्षिण-मध्य युरोपात वसलेल्या स्लोव्हेनिया व क्रोएशियाच्या मध्ये 'किंग्डम ऑफ एन्क्लाव्हा' नावाच्या एका नव्या राष्ट्राची निर्मिती झाली असून, अद्याप या राष्ट्राला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे बाकी आहे. स्लोव्हेनिया तसेच क्रोएशिया दोन्ही देशांनी या छोटेखानी प्रदेशावर दावा केलेला नसल्याने स्थानिकांनी पुढाकार घेत हे एक स्वतंत्र राष्ट्र असल्याचे घोषित केले.