Whats new

भारताकडून मंगोलियाला एक अब्ज डॉलरची मदत

मंगोलियाची आर्थिक क्षमता आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी एक अब्ज डॉलरची पतरेषा (मदत) पुरविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मंगोलियासोबतचे संबंध ‘सर्वसमावेशक‘ ते ‘राजनैतिक भागीदारी‘पर्यंत वाढविण्यासाठी भारताने मंगोलियासाठी एक अब्ज डॉलरची पतरेषा जाहीर केली. 
नरेंद्र मोदी हे मंगोलियाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. त्यांनी चाइमद सैखानबिलेग यांच्यासोबत विविध मुद्यांवर चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चौदा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. संरक्षण, सायबर सुरक्षा, शेती, ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रात करार केले.