Whats new

भारत आणि चिनी कंपन्यांदरम्यान २२ अब्ज डॉलरचे २६ करार

तीन दिवसांचा दौरा आटोपून मंगोलियाकडे रवाना होण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय येथे चीनमधील २२ अग्रणी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) संवाद साधून चिनी गुंतवणुकदारांना भारतातील बदललेल्या स्थितीत ‘मेक इन इंडिया’त सहभागी होण्याची साद घातली. एवढेच नाही तर या वेळी भारत आणि चिनी कंपन्यांदरम्यान २२ अब्ज डॉलरचे २६ करारही झाले. फुदान विद्यापीठातील महात्मा गांधी अध्यासनाचे उद्घाटन करून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.