Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड

AKHIL BHARTIY MARATHI SAMMELAN  

2015 चे ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड येथे होणार असून, त्याचे यजमानपद डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीला मिळाले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी ही घोषणा केली. घुमानच्या साहित्य संमेलनास उपस्थित राहण्यास मराठी साहित्यिक तसेच रसिकांना अनेक अडचणी आल्या होत्या. तसेच पुढच्या महिन्यात होणारे विश्व मराठी साहित्य संमेलनही अंदमान येथे होणार असल्याने महामंडळाने मध्यवर्ती ठिकाणाची निवड केली आहे.

पंजाबमधील घुमान येथे 88 गाजलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनानंतर ८९वे साहित्य संमेलन नेमके कुठे होणार याबाबत साहित्य रसिकांमध्ये उत्सुकता होती.यंदाच्या संमेलनासाठी राज्यभरातून विक्रमी म्हणजेच एकूण १२ ठिकाणांहून प्रस्ताव आलेले होते. त्यातही पिंपरी-चिंचवडमधूनच ३ प्रस्ताव होते. पंजाबमधील घुमान येथे 88 गाजलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते.