Whats new

देशात 1,866 राजकीय पक्ष

party  

देशभरात तब्बल 1866 नोंदणीकृत पक्ष असून, मार्च 2014 ते जुलै 2015 या काळात 239 नव्या पक्षांची नोंदणी झाली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
देशातील राजकीय पक्षांसंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 जुलैपर्यंत 1866 राजकीय पक्ष होते. यातील 56 पक्ष हे राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय असल्याची नोंद आहे. 5 मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली होती. 10 मार्च 2014 रोजीपर्यंत देशात 1,593 राजकीय पक्ष होते. मार्च 11 ते 21 मार्च 2014 या काळात 24 पक्षांची नोंद झाली. तर 26 मार्चपर्यंत यामध्ये आणखी दहाने भर पडली. मार्च 2014 पर्यंत निवडणूक आयोगाकडे 1,627 पक्षांची नोंद होती. मार्च 2014 ते जुलै 2015 या काळात 239 नव्या पक्षांची नोंदणी झाली आहे. नूतन पक्षांना 84 निवडणूक चिन्हांपैकी एका निवडीचा पर्याय आयोगाने दिला होता. लोकसभा 2014 च्या निवडणुकीत 464 राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले होते, अशी निवडणूक आयोगाची संकलित केलेली माहिती कायदा मंत्रालयालाही पाठवली आहे.