Whats new

भारतीय वंशाचे सुंदर पिचई गूगलचे सीईओ

Google  

जगातील सर्वात लोकप्रिय इंजिन असलेल्या 'गूगल'च्या सीईओपदी भारतीय वंशाच्या सुंदर पिचई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गूगलचे संस्थापक सर्जी ब्रिन व लॅरी पेज यांनी कंपनीत फेरबदल करत नवीन नियुक्त्या केल्या आहेत. तसेच एक मोठा बदल करत 'अल्फाबेट इंक' नावाची नवी कंपनीही स्थापन केली आहे.
भारतात जन्म घेतलेले ४३ वर्षीय सुंदर पिचई हे मूळचे तामिळनाडूतील चेन्नई येथील रहिवासी आहेत. त्यांनी आयआयटी खरगपूरमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली व त्यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. टेक वर्ल्डमधील मोठे नाव असलेले पिचई, गेल्या ११ वर्षांपासून गूगलमध्ये कार्यरत आहेत.
दरम्यान नव्याने स्थापन झालेल्या 'अल्फाबेट इंक' कंपनीच्या छत्राखाली गुगल व इतर उपकंपन्या येणार असून त्याचे सीईओपद लॅरी पेज यांच्याकडे असेल तर सर्जी ब्रिन अध्यक्षपद सांभाळतील.