Whats new

इंधनामध्ये 10 टक्के इथेनॉल वापर अनिवार्य होणार

Ethenol  

इंधनामध्ये इथेनॉलाचा 10 टक्के वापर अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुढील वर्षाच्या ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे साखर उद्योगालाही लाभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत बैठक झाल्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. इथेनॉल निर्मितीमुळे साखर कारखान्यांना लाभ होणार आहे. ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून यामुळे 14 हजार कोटींची वृद्धी या व्यवसायात होऊ शकते. सध्या इंधनामध्ये 5 टक्के इथेनॉल मिसळणे अनिवार्य आहे. परंतु सध्या तेल कंपन्या फक्त 2 टक्के इथेनॉल मिसळण्याबाबत तयार आहेत.
पुढील वर्षापासून इथेनॉल उत्पादनामध्ये खऱया अर्थाने वाढ होईल. इंधनामध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळीसाठी 230 कोटी लिटर्स एवढी मागणी होऊ शकते. त्याचा फायदा थेट साखर उद्योगाला मिळणार असल्याचेही या अधिकाऱयाने सांगितले. तेल कंपन्यांनाही याबाबतची कल्पना देण्यात आली असून पुढील वर्षापासून हे करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.