Whats new

पंकज अडवाणी १३व्यांदा विश्वविजेता

Pankaj  

भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने विश्व ६ रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत विजय संपादन करून आपल्या कारकिर्दीतील १३वे जागतिक विजेतेपद आपल्या नावावर राखले.
'जेतेपद कायम राखण्यात यश मिळवण्याचा आनंद निराळाच असतो. स्नूकर अनिश्चिततेचा खेळ आहे. अंतिम फेरीत पोहोचेन असे वाटलेही नव्हते. या स्पध्रेत नवीन काही तरी शिकायला मिळेल आणि त्याचा पुढील वर्षी होणाऱ्या व्यावसायिक स्पर्धामध्ये फायदा होईल या उद्देशाने येथे दाखल झालो होतो,'' असे मत पंकजने व्यक्त केले.