Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

अमिताभ बच्चन महाराष्ट्राचे व्याघ्रदूत

Amitabh Bachchan   

महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून काम करण्यास महानायक बीग बी अमिताभ बच्चन यांनी सहमती दाखवली आहे. व्याघ्रदूत म्हणून जे काही करायचे असेल त्यासंदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शन करावे, असे बच्चन यांनी म्हटले आहे. 4 जुलै रोजी व्याघ्र संरक्षण फाऊंडेशनच्या कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी व्याघ्रदूतासाठी अमिताभ बच्चन यांना विनंती केली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार मुनगंटीवार यांनी 29 जुलै 2015 रोजी अमिताभ यांना पत्र लिहून महाराष्ट्राच्या व्याघ्र संवर्धन प्रकल्पासाठी ब्रॅण्ड ऍम्बेसीडर म्हणून काम करावे, अशी विनंती केली होती. राज्य सरकारची ही विनंती मान्य करीत असल्याचे पत्र अमिताभ बच्चन यांनी मुनगंटीवार यांना पाठवले आहे. महाराष्ट्रातील वाघांची संख्या वाढावी यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार विविध उपाययोजना करीत आहे. त्यासाठी देशातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोहीम हाती घेण्यात आली आहे. हे प्रयत्न अधिक यशस्वी व्हावेत यासाठी मोहिमेला चांगला चेहरा मिळावा, असा राज्य सरकारचा प्रयत्न होता. अमिताभ बच्चन यांच्या प्रतिसादामुळे या प्रयत्नांना यश आले आहे. अमिताभ बच्चन हे सध्या एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीच्या ‘सेव्ह अवर टायगर्स’ या मोहिमेचे ब्रॅण्ड ऍम्बेसीडर म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे आता बच्चन हे एकाचवेळी एनडीटीव्ही आणि महाराष्ट्र सरकारसाठी खव्याघ्रदूत म्हणून काम करतील. सध्या महाराष्ट्रात ताडोबा-अंधारी, पेंच, सहय़ाद्री, नागझिरा असे व्याघ्र प्रकल्प आहेत. वन खात्याने 2006 पासून वाघांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे 2010 मध्ये राज्यातील वाघांची संख्या ही 103 वर पोचली. आता गेल्या वर्षी वाघांची संख्या ही 190 इतकी झाली आहे.