Whats new

रावत नवे निवडणूक आयुक्त

election commission  

भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) माजी अधिकारी ओमप्रकाश रावत यांची नवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली. मध्य प्रदेश केडरचे अधिकारी असलेले रावत केंद्रात सचिवपदी होते. पदभार स्वीकारल्यापासून त्यांची नियुक्ती ग्राह्य धरली जाणार असल्याचे कायदे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. दोन डिसेंबर 1953 रोजी जन्मलेले रावत 1977 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. निवडणूक आयुक्त पदावर ते तीन वर्षे राहतील.