Whats new

रिझर्व्ह बँके कडून केंद्राला 65,896 कोटींची भेट

RBI  

रिझर्व्ह बँकेने आपला 65,896 कोटी रूपयांचा वार्षिक अतिरिक्त नफा केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. 2015 मध्‍ये अतिरिक्त नफ्याची रक्कम गेल्या वर्षीच्या (2014) रकमेपेक्षा 25 टक्क्यांनी अधिक आहे.

"रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत केंद्र सरकारला जून 30, 2015 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 658.96 अब्ज रूपयांचा नफा हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला आहे", असे रिझर्व्ह बँकेने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेकडून जुलै-जून आर्थिक वर्ष ग्राह्य धरले जाते.मागील आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला 52,679 कोटी रूपये हस्तांतरित केले होते.