Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

‘जीएसटी’साठी विशेष अधिवेशन?

sansad  

भारताच्या व्यापार-उदिमाच्या क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी) मंजूर न करताच संसदेची दोन्ही सभागृहे अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून ‘जीएसटी’ देशभर लागू करण्याचा निर्धार सरकारचा आहे.एवढेच नव्हे तर यासाठी राज्यसभेचे विशेष अधिवेशन भरविण्याचा मार्ग ही सरकारने खुला ठेवला आहे.

विरोधकांच्या गोंधळाने कोणतेही फारसे कामकाज न होता दोन्ही सभागृहे अनिश्चित काळासाठी स्थगित केली गेल्यानंतर जेटली म्हणाले की, सभागृहे स्थगित झाली असली तरी संसदेचे पावसाळी अधिवेशन आत्ताच संस्थगित न करण्याचे मत्रिमंडळाच्या संसदीय व्यवहार समितीत ठरविण्यात आले आहे. सरकार बदलत्या परिस्थितीचा आढावा घेत राहील. १ एप्रिलपासून ‘जीएसटी’ लागू करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करू. काँग्रेसने ‘जीएसटी’ रोखले असले तरी संसदेतील बहुमत या विधेयकाच्या बाजूने आहे, असा दावाही त्यांनी केला.‘जीएसटी’ विधेयक याआधी लोकसभेने मंजूर केले आहे. पण राज्यसभेत मात्र विरोधकांच्या गोंधळाने ताज्या अधिवेशनात ते मंजुरीसाठी घेता आले नाही.