Whats new

'सेबी'च्या संचालक मंडळावर ज्येष्ठ वकील अरूण साठे यांची नियुक्ती

SEBI  

केंद्र सरकारने 'सेबी'च्या संचालक मंडळावर ज्येष्ठ वकील अरूण साठे यांची नियुक्ती करण्‍यात आली आहे. अरूण साठे हे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे मोठे बंधू असून, ते काहीवर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही पूर्णवेळ कार्यकर्ते होते. १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वायव्य मुंबईतून सुनील दत्त यांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते पराभूत झाले होते.

अरूण साठे यांची सेबीच्या संचालक मंडळावर अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सेबीच्या संचालक मंडळावर पाच सदस्य नेमण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे. देशातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या संस्थांवर राजकारणाशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केली जात.