Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

अभिषेकला आर्चेरी (तिरंदाजी) वर्ल्डकप स्पर्धत ‘सुवर्ण’ पदक

Abhishek Verma  

अभिषेक वर्मा याने भारतीयांना स्वातंत्र्यदिनाची अनोखी भेट देताना आर्चेरी (तिरंदाजी) वर्ल्डकप स्पर्धेच्या पुरुषांच्या कम्पाऊंड प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे एकदिवसआधी सांघिक कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत अपयशी ठरलेल्या अभिषेकने वैयक्तिक प्रकारामध्ये सगळी कसर भरुन काढताना भारतासाठी सुवर्ण जिंकले.

जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या अभिषेकने अंतिम सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करताना इराणच्या इस्माईल इबादीला १४८-१४५ झुंजाररीत्या नमवले. या विजयासह अभिषेकने गतवर्षी आशियाई स्पर्धेत झालेल्या इस्माईलविरुध्द झालेल्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा देखील काढला.

तसेच इस्माईलने देखील यावेळी कडवी झुंज देताना अभिषेकला गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र अचूक तिरंदाजीचा धडाका लावलेल्या अभिषेकपुढे त्याचा अखेरपर्यंत निभाव लागला नाही. इंचिओन आशियाई स्पर्धेच्या कम्पाऊंड प्रकाराच्या अंतिम सामन्यात अभिषेकला इस्माईलविरुध्द १४१-१४५ असा पराभव पत्करावा लागला होता.