Whats new

सानिया मिर्झा हिला 2015 चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

SANIYA MIRZA  

टेनिसपटू सानिया मिर्झा हिला यंदाचा "राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार‘ प्रदान करण्यात येईल. तिच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे हिच्यासह 17 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पुरस्कार विजेत्यांची यादी निश्‍चित केली. अर्जुन पुरस्कार मिळालेल्या प्रमुख खेळाडूंमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, हॉकी गोलरक्षक पीआर श्रीजेश, नेमबाज जितू राय यांचा समावेश आहे. अपंगा क्रीडापटू शरथ गायकवाड यालाही अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येईल. मंत्रालयाने म्हटले आहे की, "यंदा पुरस्कारासाठी बरीच नामांकने आली. केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्या. व्हीके बाली यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने यादी निश्‍चित केली.
अर्जुन पुरस्काराचे मानकरी - पीआर श्रीजेश (हॉकी), दीपा कर्माकार (जिम्नॅस्टीक्‍स), जितू राय (नेमबाजी), संदीप कुमार (तिरंदाजी), मनदीप जांगडा (मुष्टियुद्ध), बबिता, बजरंग (कुस्ती), रोहित शर्मा (क्रिकेट), के. श्रीकांत (बॅडमिंटन), स्वर्णसिंग विर्क (रोईंग), सतीश शिवलिंगम (वेटलिफ्टिंग), युमनाम सांथोई देवी (वुशू), शरथ गायकवाड (पॅरालिंपीक), एमआर पुवम्मा (ऍथलेटिक्‍स), मनजीत चिल्लर, अभिलाषा म्हात्रे (कबड्डी), अनुपकुमार यामा (रोलरस्केटिंग)