Whats new

भारतीय खेळाडूंची मानांकनात सुधारणा

iccr anking  

गॅलेत लंकेविरूद्धची पहिली कसोटी गमावूनही भारतीय खेळाडूंची कसोटी मानांकनात सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. आयसीसीच्या ताज्या कसोटी मानांकनात भारताच्या अश्विनने गोलंदाजांच्या विभागात पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये स्थान मिळविले आहे. कसोटी फलंदाजांच्या मानांकनात शिखर धवनने 32 वे स्थान मिळविले असून त्याचे मानांकन 15 स्थानांनी वधारले आहे.आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या मानांकनात रवीचंद्रन अश्विनने 9 वे स्थान मिळविले आहे. गॅलेच्या पहिल्या कसोटीत अश्विनने 10 गडी बाद केले. या कामगिरीमुळे अश्विनचे स्थान 3 अंकांनी वधारले. कसोटी अष्टपैलूंच्या मानांकन यादीत अश्विन सध्या दुस-या स्थानावर आहे.

फलंदाजांच्या यादीत धवनने 32 वे स्थान मिळविले असून त्याच्या मानांकनात 15 अंकांनी सुधारणा झाली. गॅलेच्या कसोटीत धवन आणि कोहली यांनी शतके नेंदविली होती. विदेशात सलग डावात शतके नोंदविणाऱया भारतीय फलंदाजांमध्ये धवन तिसरा असून यापूर्वी सुनील गावसकर आणि दविड यांनी हा विक्रम केला होता. गॅलेची कसोटी जिंकल्याने लंकेचा कर्णधार मॅथ्युज फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. मात्र चंडीमलने या यादीत 23 व्या स्थानावर झेप घेतली आहे. गोलंदाजांच्या यादीत रंगण्णा हेराथने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.कसोटीत सर्वाधिक बळी मिळविणाऱया डावखुऱया फिरकी गोलंदाजांच्या यादीत हेराथ सध्या तिसऱया स्थानावर असून त्याने 270 बळी घेतले आहेत. या यादीत न्युझीलंडचा व्हेटोरी 362 बळींसह पहिल्या, इंग्लंडचा अंडरवूड 297 बळींसह दुसऱया, हेराथ 270 बळींसह तिसऱया आणि बिशनसिंग बेदी 266 बळींसह चौथ्या स्थानावर आहे.