Whats new

जोकोव्हिकला नमवून मरे अजिंक्य, स्वित्झर्लंडच्या बेनसिककडे रॉजर्स चषक

Andy Murray  

रॉजर्स चषक पुरूषांच्या एटीपी टेनिस स्पधेंत ब्रिटनच्या ऍन्डी मरेने सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोव्हिकचा पराभव करून अजिंक्यपद पटकाविले. गेल्या 25 महिन्यांच्या कालावधीत सलग आठ सामने गमविण्याची मालिका मरेने या जेतेपदाने खंडित केली.

मरेने अंतिम सामन्यात जोकोव्हिकचा 6-4, 4-6, 6-3 असा पराभव केला.  2013 च्या विम्बल्डन स्पर्धेतील अंतिम सामन्यात मरेने जोकोव्हिकला पराभूत केले होते. या जेतेपदामुळे मरेच्या मानांकनात सुधारणा झाली असून  आता तो ताज्या मानांकनात तिसऱया स्थानावरून दुस-या स्थानवर त्याने झेप घेतली आहे. 2015 च्या टेनिस हंगामातील जोकोव्हिकचा हा चौथा पराभव 2012 च्या सिनसिनॅटी स्पर्धेतील फेडररकडून झालेल्या पराभवानंतर जोकोव्हिकने मास्टर्स सिरीज स्पर्धेत सलग 12 अंतिम सामने जिंकले.

स्वित्झर्लंडच्या 18 वर्षीय बेलिंडा बेनसिकने येथे रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात बेनसिकने रूमानियाच्या द्वितीय मानांकित सिमोना हॅलेपचा 7-6 (7-5), 6-7 (4-7), 3-0 असा पराभव केला. या सामन्यात तिसऱया सेटमधील पहिले तीन गेम्स गमविल्यानंतर दुखापतीमुळे हॅलेपने हा सामना अर्धवट सोडून दिला.

बेनसिकने या स्पर्धेत दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडविताना अमेरिकेच्या अग्रमानांकित सेरेना विल्यम्सला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का दिला होता. तर कॅरोलिन वोन्झियाकी आणि सर्बियाची इव्हानोव्हिक यानाही पराभूत करून शौकीनांना आपला दर्जा दाखवून दिला. बेनसिकने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली असून आता ती महिना अखेरीस सुरू होणा-या अमेरिका ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत सज्ज झाली आहे.