Whats new

विमान क्षेत्रातील सर्वात मोठा करार

indigo  

देशातील सर्वात मोठा विमानसेवा क्षेत्रातील करारात ‘इंडिगो’ने 250 ए 320 नियो (न्यू इंजिन ऑप्शन) विमाने खरेदीची ऑर्डर दिली आहे. युरोपीयन निर्माता कंपनी ‘एयरबस’च्या किंमत यादीनुसार, या 250 विमानांची एकूण किंमत 25.5 अब्ज डॉलर आहे.

इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, याबाबत एअरबस एअरक्राफ्ट खरेदी करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या. जगातील सर्वात मोठय़ा विमान खरेदी ऑर्डरनुसार, गुडगाव स्थित इंडिगोने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात 250 ए 320 नियो विमानांची खरेदीवर स्वाक्षरी केल्या होत्या. कंपनीने यापूर्वी 2005 मध्ये 100 ए 320 विमाने आणि 2011 मध्ये 180 ए 320 विमानांची खरेदी ऑर्डर दिली आहे. यांचा एकूण खर्च जवळपास 11 अब्ज डॉलर आहे. इंडिगोचे अध्यक्ष आदित्य घोष यांनी सांगितले की, नवीन ऑर्डर याबाबतची माहिती देण्यात आली की, इंडिगो भारत आणि विदेशात स्वस्त विमान सेवा देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. अतिरिक्त ज्यादा इंधन क्षमतेच्या ए 320 नियो एअरक्राफ्टद्वारे आंम्ही तिकिट कमी करू आणि ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यावर लक्ष देऊ. याबाबत एअरबसचे मुख्य अधिकारी जॉन लेही यांनी सांगितले की, या ऑर्डरमुळे लक्षात येते की, विमान सेवा कंपन्यांची ए 320 ही पहिली पसंती आहे.