Whats new

बिहारच्या विकासासाठी 1.25 लाख कोटीचे ‘मेगापॅकेज’

MODI  

आगामी बिहार विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी 1.25 लाख कोटी रूपयांचे घसघसीत पॅकेज जाहीर केले. आरा येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी या पॅकेजची घोषणा केली. बिहारसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजमध्ये सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पाचे 40 हजार कोटींचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे बिहारला एकुण 1.65 लाख कोटी मिळणार आहेत.

विकास कार्यक्रमांचे उद्घाटन
बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग आणि कौशल्य विकास कार्यक्रमांच्या उद्घाटनावेळी मोदींनी पॅकेजची घोषणा केली. यावेळी 11 रस्ते प्रकल्प आणि 22 विकास कार्यक्रमांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. राज्याला जाहीर करण्यात आलेल्या या निधीमुळे राज्याचा चेहरामोहरा आणि भविष्य बदलण्यास मदत होणार आहे. पंतप्रधानांनी या मदतनिधी व्यतिरिक्त आणखी 40 हजार कोटीच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. यामुळे 1 लाख 65 हजार कोटी रुपयांचे हे पॅकेज आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने बिहारला 10 हजार कोटीचा मदतनिधी जाहीर केला होता. यातील 2013 पर्यंत 9 हजार कोटीच्या रक्कमेचा वापर करण्यात आला आहे.