Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

बीजिंगमध्ये रंगणार २०२२ ऑलिम्पिक

Beijing 2022 Olyimpic  

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) बीजिंग (चीन) शहराला २०२२ सालच्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद बहाल केले आहे. विशेष म्हणजे २००८ साली उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भूषविलेले बीजिंग शहर उन्हाळी व हिवाळी अशा दोन्ही ओलिम्पिकचे यजमानपद भूषविणारे पहिले शहर ठरले आहे.

२०२२ सालच्या हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद पटकावण्याच्या शर्यतीमध्ये बीजिंग समोर काजाकिस्तानच्या अलमाटी शहराचे मोठे आव्हान होते. परंतु, बिजींगने ८५ आयओसी देशांच्या मतांच्या जोरावर बाजी मारली. बिजींगमध्ये नैसर्गिक बर्फाची कमतरता असूनही या शहराला २०२२ सालच्या हिवाळी ओलिम्पिकचे यजमानपद देण्यात आले. यास कारण म्हणजे, २००८ साली बिजींगने उन्हाळी यशस्वी आयोजन केले होते. यानुसारच चीनी प्रतिनिधी मंडळाने देखील आयोसीला हिवाळी ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनाचा विश्वास दिला.दरम्यान, या निर्णयानंतर पुर्व आशियाला सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. दक्षिण कोरीयाच्या प्योंगचांग शहरामध्ये २०१८ सालचे हिवाळी ऑलिम्पिक आयोजित होणार.