Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

भारत-बांगला सीमावासियांना 'स्वातंत्र्य'

India- Bngladesh  

भारत आणि बांगलादेश या 'शेजाऱ्यां' मध्ये गेल्या ४१ वर्षांपासून सुरू असलेला भू-सीमाप्रश्न 1ऑगस्‍ट२०१५ कायमचा संपला आहे. १९४७च्या फाळणीमुळे बांगलादेशात गेलेल्या ५१ भूभागांमध्ये आणि भारतात असलेल्या ११० भूभागांमध्ये जे ५४ हजार नागरिक राहत होते, त्यांना नव्याने 'स्वातंत्र्य' मिळालं आणि देशाचा नकाशा बदलला. दोन्ही देशांमधील १६२ लहानमोठ्या खेड्यांच्या अदलाबदलीमुळे ५० हजार रहिवाशांच्या नागरिकत्वाचा प्रश्नही सुटला असून सीमाभागातील १४ हजार नागरिक 'भारतीय' झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी जून २०१५ मध्‍ये ढाका इथं ऐतिहासिक भू-सीमा करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. वास्तविक, १९७४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांनी सीमावाद संपवण्यासाठी हा करार केला होता. परंतु, चार दशकं त्याची अंमलबजावणीच होऊ शकली नव्हती. मोदी सरकारनं या विषयाचं गांभीर्य ओळखून मे महिन्यात करारास संसदेची मंजुरी मिळवली आणि जूनमध्ये बांगलादेश दौऱ्यावेळी हा सीमाप्रश्न संपवला होता. त्याच कराराची अंमलबजावणी झाली.

त्यानुसार, बांगलादेश भारताला ५१ वसाहती हस्तांतरित करतोय, तर भारत १११ वसाहती बांगलादेशकडे सोपवणार आहे. भारत बांगलादेशला १० हजार एकर जमीन देतोय, तर भारताला ५०० एकर जमीन बांगलादेशकडून मिळणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारत व बांगलादेश दरम्यान ४०९६ कि.मी.ची सीमा असून, तेथून दहशतवादी सहज बांगलादेशात जाऊ शकत होते. त्याला या करारामुळे आळा बसणार आहे. या सीमा करारामुळे स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर पुन्हा 'स्वतंत्र' झालेल्या सीमावासियांनी हा 'स्वातंत्र्योत्सव' जल्लोषात साजरा केला. भारतीय म्हणून ओळख मिळालेल्या नागरिकांनी तिरंगा फडकवून, रांगोळ्या काढून आणि रोषणाई करून आपला आनंद व्यक्त केला.