Whats new

टीबी रोखणाऱ्या देशांच्या क्रमवारीत भारत चौदावा

T.B.  

जागतिक पातळीवर 22 क्षयरोगग्रस्त (टीबी) देशांच्या क्रमवारीमध्ये भारत चौदाच्या स्थानी असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतातील क्षयरोगग्रस्त रुग्णांची संख्या 26 लाख एवढी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी लोकसभेत दिली. "एमडी-आर‘ क्षयरोग झालेल्यांची संख्या केवळ 61 हजार एवढीच असून, त्यांना बहुविध प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधांचा पुरवठा केला जात आहे. देशातील खासगी रुग्णालयांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाल्याने बरेचसे क्षयरोग झालेले रुग्ण राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात आपले नाव नोंदविण्याचे टाळतात . सर्वप्रथम 2003 मध्ये क्षयरोग निर्मूलनाचा कार्यक्रम सुरू झाला होता 2013 पर्यंत तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला.