Whats new

एलपीजी अनुदान योजनेची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

LPG CYLINDER  

केंद सरकारची एलपीजी अनुदान योजना आता गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील झाली आहे. याला जगातील ‘सर्वात मोठा (देशी) रोख लाभ कार्यक्रम’ मानण्यात आला आहे. पेट्रोलियम तसेच नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून भारत पेट्रोलियमने यासाठी 15 जून रोजी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज केला होता. या अर्जात तेल कंपन्यांनी आपल्या 80 टक्के ग्राहकांना या योजनेशी जोडल्याचे म्हटले गेले होते. या कंपन्यांनी देशभराच्या अशा 12 कोटी 57 लाख ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये एकूण 1 खर्व 98 अब्ज 50 कोटी रुपये टाकले आहेत, जे या अनुदानाच्या योजनेशी जोडले गेले आहेत. परंतु आता हे प्रमाण 13 कोटी 90 लाख ग्राहक या योजनेशी संलग्न झाले आहेत आणि 2 खर्व 36 अब्ज 18 कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसला आपल्या तपासणीत हा दावा खरा असल्याचे आढळले, त्याने अमेरिका, चीन समेवत दुसऱया देशांच्या कठोर मापदंडांतर्गत या प्रकारच्या रोख हस्तांतरणाच्या अंमलबजावणीच्या दाव्याची चौकशी केली. त्यानंतरच भारत पेट्रोलियमच्या अर्जाच्या आधारावर एलपीजी अनुदान योजनेला गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये सामील.