Whats new

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा 2015 चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

MAHARASHTRA BHUSHAN AWARD  

महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा असा आहे. विशेष म्हणजे आजच बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस आहे आणि याच दिवशी त्यांचा हा राज्यातील सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आलं. रोख रक्कम दहा लाख रुपये, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीड, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन महाराष्ट्राचं नाव उज्वल करणाऱ्या व्यक्तींना हा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित केलं जातं.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित व्यक्ती :
1996 – पु. ल. देशपांडे (साहित्य)
1997 – लता मंगेशकर (कला, संगीत)
1999 – विजय भाटकर (विज्ञान)
2000 – सुनील गावसकर
2001 – सचिन तेंडुलकर (क्रीडा)
2002 – भीमसेन जोशी (कला, संगीत)
2003 – अभय बंग आणि राणी बंग (समाजसेवा आणि आरोग्यसेवा)
2004 – बाबा आमटे (समाजसेवा)
2005 – रघुनाथ माशेलकर (विज्ञान)
2006 – रतन टाटा (उद्योग)
2007 – रा. कृ. पाटील (समाजसेवा)
2008 – नानासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा)
2008 – मंगेश पाडगावकर (साहित्य)
2009 – सुलोचना लाटकर (कला, सिनेमा)
2010 – जयंत नारळीकर (विज्ञान)
2011 – अनिल काकोडकर (विज्ञान)
2015 – बाबासाहेब पुरंदरे (साहित्य)

बाबासाहेब पुरंदरे यांची माहिती :-
पूर्णनाव :- बळवंत मोरेशवर पुरंदरे
जन्‍म :- २९ जुलै १९२२
जन्‍म ठिकाण :- पुणे
कार्ये:-
१) १६व्‍या शतकात दख्‍खण, कोकण व माळवा या महाराष्‍ट्रातील प्रांतामध्‍ये मुस्लिम राजवटींना आव्‍हान देऊन मराठा साम्राज्‍यांची स्‍थापना करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांवरील सर्व माहिती जनसामान्‍यापर्यंत आपल्‍या लेखणीने पोहचण्‍याचे कार्य यांनी केले आहे. सोबत शिवचारित्र्यावर शिवाजी जाणता राजा हे भव्‍य नाटकही त्‍यांनी तयार केले.
२)'ठिणग्‍या' या पुस्‍तकाची रचना सर्वात प्रथम करून आपले लेखनकार्य सुरू केले. तसेच राजा शिवछत्रपती केसरी, नारायण राव पेशवा इ.पुस्‍तके प्रसिध्‍द आहेत
. ३) जाणता राजा या नाटकाची १४८५ पासून सुरुवात.
४) यांना नाटकातील उल्‍लेखनीय कार्याबद्दल मध्‍यप्रदेशने २००७-०८ मध्‍ये कालीदास सम्‍मानाने सन्‍मानित केले आहे.