Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

समुद्र गुप्त कश्यप यांना भूपेन हजारिका पुरस्कार

BHUPAN HAJARIKA AWARD  

ईशान्य भारतातील राष्ट्रीय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सरहद संस्थेच्यावतीने दिला जाणारा 'भूपेन हजारिका पुरस्कार' आसाममधील ज्येष्ठ पत्रकार समुद्र गुप्त कश्यप यांना जाहीर झाला आहे.
५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सरहद संस्थेच्यावतीने २०१२ पासून हा पुरस्कार देण्यात येत असून याआधी दिग्दर्शक जाहनु बरूआ, नाट्यकर्मी प्रा. रतन थिय्याम यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. जाहनु बरूआा यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.