Whats new

शैक्षणिक कर्जासाठी सरकारचे विशेष पोर्टल

EDUCATION LOAN  

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करून कर्जाच्या स्वरुपातील आवश्य‘क ती आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने शैक्षणिक कर्जाबाबत मार्गदर्शन करणारे विशेष पोर्टल (संकेतस्थळ) सुरु केले आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध देण्यासाठी सरकारने भारतीय स्टेट बॅंक, आयडीबीआय बॅंक व बॅंक ऑफ इंडियासह अन्य पाच बॅंकांशी भागीदारी केली आहे. https://www.vidyalakshmi.co.in नावाच्या या पोर्टलवर शैक्षणिक कर्जाच्या योजना, अर्जाचा नमुना, एकाच अर्जाद्वारे अनेक बँकांमध्ये अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्यांबाबत माहिती देण्यात येणार असून इ-मेलद्वारे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात येणार आहे.
"स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पोर्टलची सुरूवात करण्यात आली आहे. हे पोर्टलचे काम केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक सेवा विभाग, उच्चशिक्षण विभाग, मानव संसाधन विकास विभाग व इंडियन बॅंक्स् असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली ‘नॅशनल सिक्युतरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्च र लिमिटेड‘ पाहणार आहे‘ अशी माहिती अर्थमंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे.