Whats new

गॅस सिलिंडर असल्यास रेशनकार्डवर रॉकेल मिळणार नाही

GAS CYLINDER  

घरात सिलेंडर असेल तर यापुढे रेशनकार्डवर रॉकेल मिळणार नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागानं हा निर्णय घेतला आहे. तसंच ग्रामीण आणि शहरी भागातल्या रेशनकार्डधारकांना रॉकेलचं समान वाटप करण्याचा निर्णयही विभागानं घेतला आहे.
दोन गॅस जोडणी रेशनकार्डधारकास 12 गॅस सिलिंडर सवलतीच्या दराने आणि एका गॅस सिलिंडरची जोडणी मिळालेल्यांना वर्षभरात १२ सिलिंडर मिळत असल्याने यापुढे त्यांना रॉकेल मिळणार नाही. असे विभागाने काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. आतापर्यंत शहर आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळा कोटा होता. शहरांसाठीच्या कोट्याची विभागणी आठ प्रकारात करण्यात आली होती. शहरी भागात इंधनाचे इतर स्रोत उपलब्ध नसल्याचे कारण देत इतकी वर्षे शहरी नागरिकांसाठी जादा रॉकेल वाटप केले जात होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने दोन्ही भागात समान रॉकेल वाटप करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
शिधापत्रिकेवरील व्यक्तींची संख्या --- केरोसिन कोटा (लिटर)
1. 1 व्यक्ती - 2 लिटर
2. 2 व्यक्ती -3 लिटर
3. 3 व्यक्ती वा त्याहून अधिक व्यक्ती - 4 लिटर