Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

देशातील एकमेव कंपनी; 51 कंपन्यांची यादी जाहीर

FORTUNE  

जगप्रसिद्ध ‘फॉर्च्युन’ मासिकाने आघाडीच्या 51 कंपन्यांच्या यादीत जैन इरिगेशनला सातवे स्थान देऊन गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे "फॉर्च्युन‘च्या यादीत स्थान मिळविणारी ती एकमेव भारतीय कंपनी ठरली आहे.

आपापल्या क्षेत्रात जागतिक पातळीवर परिवर्तन घडवून आणणाऱ्या आणि विशेष प्रगती करणाऱ्या जगभरातील 51 कंपन्यांची यादी "फॉर्च्युन‘ने अलीकडेच जाहीर केली. सामाजिक आणि पर्यावरणाच्या समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या प्रमुख कंपन्यांचा यात समावेश आहे. व्होडाफोन व सफारीकॉमचे गरीब राष्ट्रांमधील नेटवर्क, मलेरियावर औषध शोधून लाखो मुलांचा जीव वाचविणारी जीएसके कंपनी यांच्या कार्याचा यात उल्लेख आहे; तर जैन इरिगेशनने आपल्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने 50 लाख गरीब

शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावले, यासाठी प्रयत्न केल्याचाही विशेष उल्लेख यात करण्यात आला आहे.

सात हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या जैन इरिगेशनचे भारताबाहेरही अनेक देशांमध्ये प्रकल्प आहेत. कृषीसाठी ठिबक, सूक्ष्मसिंचन, टिश्यूरकल्चर, फूड प्रोसेसिंग, पाइपनिर्मिती आदी क्षेत्रांत जैन इरिगेशनचा लौकिक भारतासह अन्य राष्ट्रांमध्येही आहे. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांनी शून्यातून निर्माण केलेले या विश्वाआची फॉर्च्युनसारख्या नामांकित संस्थेने दखल घ्यावी, ही बाब खानदेशवासीयांसाठी अभिमानाची ठरली आहे.