Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

राज्यात सहा "सौर शहरे' बनणार

SOLAR CITY  

महाराष्ट्रातील नागपूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद, नांदेड आणि शिर्डी, तसेच गोव्यातील पणजीसह देशातील साठ शहरे अपारंपरिक व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या "सौर शहरे‘ योजनेंतर्गत विकसित केली जाणार आहेत. प्रत्येक राज्यातील 50 हजार ते 50 लाख या लोकसंख्येदरम्यानच्या किमान एक आणि कमाल पाच शहरांचा यात समावेश आहे. <br/. या प्रकल्पांतर्गत मंजुरी मिळालेल्या 50 पैकी 46 शहरांचा विकास आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहाही व गोव्यातील पणजी या शहरांचा मास्टर प्लॅन तयार आहे. यासाठी 23.70 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यातील 6.11 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. अशा प्रकारचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने जून 2009 मध्येच 26 सल्लगार संस्थांची नियुक्ती केली आहे.
आठ प्रमुख शहरे ही "मॉडेल सौर शहरे‘ म्हणून विकसित केली जात आहेत. यातील नागपूर, चंडीगड, गांधीनगर आणि म्हैसूर या शहरांना आधीच परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येकी साडेनऊ कोटी रुपयांचे अर्थसाह्यदेखील देण्यात आले आहे, तर अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी तेवढीच रक्कम (साडेनऊ कोटी रुपये) स्थानिक स्वराज्य संस्था (महापालिका), राज्य सरकार, स्थानिक प्रशासन किंवा खासगी सार्वजनिक भागीदारी यामार्फत देण्यात आले आहेत.
देशभरातील 13 शहरे पथदर्शी सौर शहरे म्हणून विकसित केली जात आहेत. त्यात महाराष्ट्रातील ठाणे आणि शिर्डी या दोन शहरांसोबतच आगरताळा, कोइम्बतूर, राजकोट, शिमला, फरिदाबाद, रायपूर, लेह, ऐज्वाह, पुद्दुचेरी, विजयवाडा आणि अमृतसर यांचा विकास केला जात आहे.
महाराष्ट्रातील शहरे
नागपूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद, नांदेड आणि शिर्डी.
अशी असेल योजना
निवड झालेल्या शहरांना 50 लाख रुपयांपर्यंतचे केंद्राचे अर्थसाह्य मिळेल. त्यात विकास आराखडा, सोलर सीटी सेलनिर्मिती यांसारख्या बाबींवर भर असेल.