Whats new

फेडररने जिंकले सातवे सिनसिनाटी विजेतेपद

ROJAR FEDDER  

स्वित्झर्लंडच्या द्विमतीय मानांकित रॉजर फेडररने सिनसिनॅटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीचे सातव्यांदा विजेतेपद मिळविताना सर्बियाच्या टॉपसिडेड जोकोव्हिकला पराभवाचा धक्का दिला. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने या स्पर्धेत महिला एकेरीचे दुसऱयांदा विजेतेपद पटकाविले.

34 वर्षीय फेडररने पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोव्हिकचा 7-6 (7-1), 6-3 असा पराभव केला. या जेतेपदामुळे फेडररला 31 ऑगस्टपासून सुरू होणा-या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत पुरूष एकेरीच्या मानांकनात पहिल्या स्थानासाठी संधी मिळाली आहे. 17 वेळा ग्रॅन्डस्लॅम विजेतेपद मिळविणाऱया फेडररने जोकोव्हिक विरूध्दच्या अंतिम सामन्यात आपल्या सर्व्हिसवर तसेच विविध फटक्यावर अचूक नियंत्रण ठेवले होते. जुलैमध्ये झालेल्या विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोव्हिकने फेडररला पराभूत करून जेतेपद मिळविले होते. या पराभवाची परतफेड फेडररने सिनसिनॅटी स्पर्धेत केली. फेडरर आणि जोकोव्हिक यांच्यातील हा अंतिम सामना दीड तास चालला होता. फेडररच्या वैयक्त्कि टेनिस कारकीर्दीतील हे एटीपी टूरवरील 87 वे जेतेपद असून मास्टर्स -1000 स्पर्धेतील 24 वे विजेतेपद आहे.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या टॉप सिडेड सेरेना विल्यम्सने रूमानियाच्या तृतीय मानांकित सिमोना हॅलेपचा 6-3, 7-6 (7-5) असा पराभव करत या स्पर्धेत दुस-यांदा विजेतेपद पटकाविले.