Whats new

शैली फ्रेजरने जागतिक अॅदथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुर्वण पदक जिंकले

shelly fejar  

जमैकाच्या उसेन बोल्टनंतर त्यांच्याच देशाच्या शैली एन. फ्रेजर प्राइसने महिलांची १०० मीटर धावण्याची र्शर्यत १०.७६ सेकंदात जिंकून जागतिक अॅजथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत वेगवान धावपटूचा मान सलग तिसऱ्यांदा जिंकून इतिहासाची नोंद केली. बर्डनेस्ट स्टेडियमच्या ट्रॅकवर शैलीने शर्यत सुरु झाल्यापासून आघाडी घेवून सुवर्णपदक आपल्या नावे केले. माजी हेप्टॉथलॉन खेळाडू हॉलंडच्या दाफने शिपर्सने १०.८१ सेकंदाची वेळ नोंदवित त्यांच्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. अमेरिकेच्या टोरी बावीने १०.८६ सें. वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले. शैलीने २००९ व २०१३ मध्ये सुद्धा सुवर्णपदक जिंकले होते.