Whats new

टिंटू लुका रियो ऑलिम्पिकसाठी पात्र

TINTU LUKA  

जागतिक अॅवथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताचे आशास्थान असलेल्या टिंटू लुकाचे आव्हान पहिल्या हिट पात्रताफेरीतच संपुष्टात आले. उपांत्यफेरीसाठी आपली जागा निश्चित न करू शकलेल्या लुकाने यंदाच्या सत्रातील आपली सर्वश्रेष्ठ वेळेची नोंद करताना आगामी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपले तिकीट पक्के केले.

८०० मीटरच्या पहिल्या फेरीतील हिटमध्ये लुकाने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना २ मिनिटे ००.९५ सेकंदांची वेळ देत शर्यत पूर्ण केली. मात्र, तिला या वेळी सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. प्रत्येक हिटमधील अव्वल तीन क्रमांकाच्या धावपटू आणि सर्वश्रेष्ठ वेळ नोंदवणारे पुढील सहा धावपटू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. लुकाने २०१०मध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना १ मिनिटे ५९.१७ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. रियो ऑलिम्पिकसाठी आवश्यक असलेली २ मिनिटे ०१:०० सेकंदाची वेळ लुकाने पार करून ऑलिम्पिक तिकीट मिळवले आहे.