Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

बाबासाहेबांच्या लंडनमधील घरावर शिक्कामोर्तब!

Dr.Babasaheb Ambedkar  

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पुनित झालेला लंडनस्थित तीन मजली बंगल्याच्या खरेदी व्यवहारावर महाराष्ट्र सरकारने शिक्कामोर्तब केले. या ऐतिहासिक वास्तूचे रुपांतर आंतरराष्ट्रीय स्मारकात केले जाणार आहे. ही वास्तू खरेदीची प्रक्रिया काही दिवसात पूर्ण केली जाणार आहे.

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि विशेष साह्यमंत्री राजकुमार बडोले यांनी या वास्तूच्या खरेदी व्यवहारांशी संबंधित कराराचे (डीड ऑफ एक्स्चेंज) मालकासोबत अदान-प्रदान केले, असे ब्रिटनमधील फेडरेशन ऑफ आंबेडकराईट अॅमण्ड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष संतोष दास (लंडन) यांनी सांगितले. या वास्तूचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्रात रुपांतर केले जाणार आहे . सन १९२१ ते १९२२ दरम्यान डॉ. आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण (डीएससी) घेत असताना लंडनस्थित १०, किंग हेन्री रोड, एनडब्ल्यू-३ स्थित याच वास्तूत राहत होते. ही वास्तू एका इस्टेट एजंटच्या मार्फत विक्रीस काढण्यात आली होती.

ही वास्तू खरेदी करण्यासाठी मालकाला अगोदरच ३ कोटी १० लाख रुपये देण्यात आले आहेत. जानेवारीत राज्य सरकारने लंडनस्थित २,०५० चौरस फुट जागेतील हा ऐतिहासिक बंगला ३१ कोटी रुपयांत खरेदी करण्याचा आणि स्मारकात रुपांतर करून ही वास्तू जतन करण्याचा निर्णय घेतला होता.

जानेवारीत राज्य सरकारने लंडनस्थित २,०५० चौरस फुट जागेतील हा ऐतिहासिक बंगला ३१ कोटी रुपयांत खरेदी करण्याचा आणि स्मारकात रुपांतर करून ही वास्तू जतन करण्याचा निर्णय घेतला होता.