Whats new

डॉ. आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त सव्वाशे रूपयांचे नाणे

DR.BABASAHEB AMBEDKAR  

भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती केंद्र सरकारच्यावतीने भव्य स्वरूपात साजरी करण्यात येणार असून, या यानिमित्त 125 रूपयांचे नाणेही बाजारात आणण्यात येणार आहे,असे केंद्राकडून जाहीर करण्यारत आले आहे.

डॉ. आंबेडकर यांची यंदा 125 वी जयंती असल्याने केंदाकडून हे अनोखे नाणे जारी करण्यात येणार आहे. या नाण्याचा आकार, आणि त्याची किंमत यावर एकमत झाले आहे. नाण्यावर डॉ. आंबेडकर यांची छबी ठळकपणे दिसणार आहे. त्यांच्या स्मरणार्थ एक पोस्टल स्टॅम्पही जारी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिल्लीतील अलीपूर रस्त्यावरील डॉ. आंबेडकर यांच्या बगल्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, येत्या ऑक्टोबरपासून या कामाला प्रारंभ होणार आहे. 125 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलपासून पुढे वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.