Whats new

ब्रिटनमधील भारतीयांची संख्या पोहोचली 7 लाखावर

ENGLAND  

ब्रिटनमध्ये जन्म न झालेल्या भारतीयांचे अस्तित्व वाढत असून 2014 च्या आकडेवारीनुसार त्यांची संख्या 7,39,000 आहे. ही संख्या ब्रिटन व्यतिरिक्त इतर देशांतील नागरिकांच्या 9.6 टक्के आहे. राष्ट्रीय सांख्यिक कार्यालयानुसार 2004 मध्ये भारतात जन्म घेतलेल्या ब्रिटनमधील रहिवाशांची संख्या 5,05,000 होती. ती 2014 मध्ये 2,88,000 नी वाढून 7,93,000 झाली आहे. मार्च अखेरीपर्यंत एकंदर स्थलांतरितांच्या संख्येने 3,30,000 गाठल्याने डेव्हिड कॅमेरून शासनाने ती संख्या एक लाखाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमधील नेहमीच्या स्थलांतरित व्यक्ती भारत, पोलंड, पाकिस्तान, रिपब्लिक ऑफ आयर्लंड आणि जर्मनी या देशातून अधिक असल्याचे 2014 च्या आकडेवारीने दर्शविले आहे. त्यामध्ये अधिकतर ब्रिटनबाहेरील व्यक्ती पोलंड, भारत, रिपब्लिक ऑफ आयर्लंड, पाकिस्तान आणि रुमानियातील असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या काही वर्षांत ब्रिटनमध्ये स्तलांतरित होणाऱया भारतीयांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. राजकीय दृष्टय़ाही आता भारतीयांनी तेथे स्थान मिळविण्यास प्रारंभ केला आहे.