Whats new

रणवीर सैनीला स्पेशल ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण

RANVIR SAINY  

गोल्फर रणवीर सिंह सैनी याने इतिहास रचताना येथे स्पेशल ऑलिम्पिक विश्व क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये सुवर्णपदक जिंकले. गोल्फमध्ये गोल्डन कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

आटिज्म रोगाने ग्रस्त १४ वर्षीय रणवीरने काल जीएफ गोल्फ लेव्हल २ अल्टरनेट शॉट टी प्ले स्पर्धेत ही गोल्डन कामगिरी केली.रणवीर आणि त्याची जोडीदार मोनिका जादू यांनी संयुक्तरूपाने दुसऱ्या स्थानी असलेल्या हाँगकाँग (सज ल्यूंग चुंग आणि किट लॅम) आणि निप्पो (ताकेफुमी हियोशी व तादातोशी साकाई) या संघाला नऊ शॉटने मागे टाकले.रणवीर दोन वर्षांचा असतानाच आटिज्म या आजाराने ग्रस्त झाला होता. त्याने वयाच्या नवव्या वर्षी गोल्फ खेळण्यास प्रारंभ केला.दोन वर्षांपूर्वी रणवीर एशिया प्रशांत विश्व क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय गोल्फर ठरला होता.